Tuesday, December 7, 2021

नांदगाव न्यायालयात वकील दिन मोठ्या उत्साहात साजरा



नांदगांव-: वार्ताहर
 देशातील जनतेच्या न्याय हक्कासाठी न्यायमंदिरात वकिलांची भूमिका महत्त्वाची आहे.असे प्रतिपादन नांदगाव न्यायालयाचे न्यायाधीश शरद दूबाले यांनी केले.
     श्री.स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था व स्व.सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
      घटना समितीचे प्रथम अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिवसानिमित्त देशात वकील दिन साजरा करण्यात येतो.
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधितज्ञ जयकुमार कासलीवाल होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून स्व.सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संस्थेच्या उपाध्यक्षा सुशिला पारख, प्रतिष्ठित व्यापारी शामभाऊ पारख,अनिल करवा,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण,रमाकांत सोनवणे,अँड.गजानन सुरसे,अँड.अमोल आहेर,अँड.युनूस शेख,अँड.महेश पाटील,अँड.कासलीवाल,अँड.दराडे,अँड. अनिल शिंदे,अँड.जयेश पाटील,अँड.बिन्नर,अँड.सौरभ कासलीवाल,अँड.सरोदे,अँड.घुगे,अँड.सचिन साळवे,उपस्थित होते.यावेळी सर्व वकिलांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सचिव अनिल धामणे यांनी केले.

No comments:

Post a Comment