Monday, December 6, 2021

उद्योजक श्रीकांत परदेशी यांचा वाढदिवस साजरा

नांदगाव   प्रतिनिधी महाराष्ट्रातला कुमावत समाज एकत्र करण्याचे काम करून त्यातील होतकरू तरुणांना कंत्राटदार बनविण्यासाठी श्रीकांत परदेशी यांनी घेतलेले परिश्रम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक व सनदी लेखापाल महावीर पारख यांनी परदेशी यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन कार्यक्रमात केले. यावेळी त्यांना समाजातर्फे   समाजभूषण असा पुरस्कार देण्यात आला. येथील गुप्ता लोंस वर आयोजित कार्यक्रमासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथून आलेल्या समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.


 

श्रीकांत परदेशी मितभाषी व प्रसन्न व्यक्तिमत्व असून त्यांचा विकास कामांचा अभ्यास चांगला असल्याने व पाठपुरावा करण्याची हातोटी असल्याने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव तालुक्यात विकास कामांची गुढी उभारली जात आहे. अशा शब्दात जिल्हा मजूर संघाचे संचालक प्रमोद भाबड यांनी प्र्देशींचे कौतुक केले. विविध वक्त्यांनी श्रीकांत यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू व त्यांचा समाजाला होणारा फायदा याविषयी मनोगत व्यक्त केले. काही वक्त्यांनी त्यांना सरकार दरबारी लोकप्रतिनिधीचे स्थान मिळावे अशी मागणी केली.  

 

अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देतांना श्रीकांत परदेशी म्हणाले की, आमच्या कुमावत समाजाकडे कौशल्य आहे. त्याच्या जोरावर मोठी घरे, इमारती बांधल्या गेल्या परंतु रोजंदारीवर काम करणारा समाज अशी उपेक्षा वाट्याला आली. हि परिस्थिती बदलण्यासाठी समाजाचे संघटन निर्माण केले. आतापर्यंत किमान १०० युवकांना कंत्राटदार म्हणून मान्यता मिळवून दिली. शासनाकडे विकासाच्या अनेक योजना वेगवेगळ्या शिर्षकाखाली मंजूर असतात त्या नांदगाव विधानसभा मतदार संघात आणण्यासाठी आमदार सुहास कांदे यांचेशी समन्वय सुरु आहे.   

   

नगराध्यक्ष राजेश कवडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश पाटील, भाजपचे माजी सभापती दिनेश बोरसे (चाळीसगाव), नागापूर राजेंद्र पवार, विलास आहेर, संचालक प्रमोद भाबड, शिवसेना प्रमुख विजय वाकचौरे (संभाजीनगर), सभापती सुभाष कुटे, अनिल रिंढे, राजाभाऊ देशमुख, किरण देवरे, आनंद कासलीवाल, प्रभाकर कर्डीवाल (सटाणा), कैलास कुंडलवाल, (नाशिक), प्रदीप कामे (शहादा), संजय बारवाल (औरंगाबाद), ईश्वर बेलदार (प्रकाशा),  प्रा. उटवाल,  बाळासाहेब कुमावत (पाथरे) , ज्ञानेश्वर कुमावत आदी उपस्थित होते. पाउस असतांना ही सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती होती. संयोजनासाठी नगरसेवक किरण देवरे, राजीव धामणे, विजय चोपडा, मनिष परदेशी आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment